सहशालेय कार्यक्रमातून सर्वांगिण विकास साधा – एम.जी.मातोंडकर

वेंगुर्ला,दि.२७ डिसेंबर 

आजच्या बदलत्या जीवनशैलीत, खेळांचे महत्व अधिकच

वाढत असून, विद्यार्थ्यांना खेळ हा भविष्यातील धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी संजिवनी ठरणार आहे. त्यामुळेच शालेय जीवनात क्रीडा महोत्सव महत्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सहशालेय कार्यक्रमातून आपला सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर यांनी केले.

अणसूर पाल हायस्कूलतर्फे शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असून याचे उद्घाटन एम.जी.मातोंडकर यांच्या हस्ते झाले. या क्रीडा महोत्सवात १०० मीटर धावणे, मॅरेथॉन स्पर्धा, गोळाफेक, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, खो खो, लंगडी आदी खेळांचा समावेश आहे. श्री.मातोंडकर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून विद्यार्थ खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली. शालेय क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, चारूता परब शिक्षकवृंद उपस्थित होते. स्वागत व आभार क्रीडा महोत्सव प्रमुख विजय ठाकर यांनी मानले.