माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही

खुद्द आदित्य ठाकरे यांनीच कबुली

सावंतवाडी,दि.६ फेब्रुवारी

माझ्यात कर्तृत्व असून सुध्दा मला उध्दव ठाकरे यांनी 2014 मध्ये राज्यमंत्री केले पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही.याची खुद्द आदित्य ठाकरे यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.तसेच धनादेशाद्वारे मी शिवसेनेला एक कोटि रूपये दिल्याचा आपल्याकडे पुरावा असल्याचेही ते म्हणाले.ते सावंतवाडीत बोलत होते.

दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती.त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.
माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डी हून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे.मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही त्याचे कर्तृत्व काय मुख्यमंत्री असतना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते.
मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाना च्या बाहेर वाट बघत होतो पण मला कधी भेट मिळत नव्हती मग यांच्याकडे लोक थांबणार कसे असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो मला भाजपकडून निमंत्रण असतना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
चौकट
पाणबुडी प्रकल्प मी मंजूर केली ठाकरेंनी नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपण पाणबुडी मंजूर केली ती गुजरात ला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले पण वस्तुस्थिती सर्वानी जाणून घ्यावी पाणबुडी मी स्वता मंजूर केली होती.पण नंतर च्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही त्यामुळेच तो रद्द झाला होता पण आताच्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.
चौकट
मी शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेची मते वाढली
मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मत लाखांच्या आत मध्ये होती पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावा ही मंत्री केसरकर यांनी केला.