कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत -अबिद नाईक

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला ,निवडणूक आयोगाचा निर्णय

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला निर्णय दिला.त्याबद्दल कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे,शहराध्यक्ष इम्रान शेख,शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले,सचिन अडूळकर,संतोष कोकाटे , अली नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागला आहे. अजित पवार यांच्याकडे पक्षाची मोठी आमदारांची ,खासदारांची संख्या आहे.राज्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी पाठीशी आहेत.त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो.