सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती

सिंधुदुर्गनगरी, दि.६ फेब्रुवारी

सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क मधील सरळसेवेतील पदांची परीक्षा टि.सी.एस – आयओएन यांच्यामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

या भरतीकरीता सविस्तर जाहिरात सूचना, सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.gov.in या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी व कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा.

तरी जिल्ह्यातील सर्व सुभेदार व समकक्ष पदावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स), शहीद जवानाच्या वीरनारी (Battle Casualty) व दिवंगत सेवारत सैनिकाची पत्नी (Physical Casualty) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.