विठुरायाचा गजर करत बाबांच्या पालखी सोबत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी घेऊन वारकरी व भक्तगण भालचंद्र महाराजांचा आणि विठुरायाचा गजर करत टाळ वाजवत कणकवलीहुन पंढरपूरच्या दिशेने मंगळवारी सकाळी मार्गस्थ झाली.
परमहंस भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग ते श्री क्षेत्र पंढरपूर असा परमहंस भालचंद्र महाराज पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कलमठ गोसावीवाडी येथे सकाळी ७ वाजता ह. भ. प. गवंडळकर महाराज व ह. भ. प. गायकवाड महाराज यांच्या शुभहस्ते आणि हरिभक्तांच्या उपस्थितीत कलश, तुळस, चोपदारदंड, टाळ, पताका पूजन करून ८ वाजता भालचंद्र महाराज संस्थान येथून पालखी घेऊन प्रस्थान करण्यात आले