श्री गणपती मंदिर देवगड किल्ला या ठिकाणी १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

देवगड,दि.०७ फेब्रूवारी
श्री गणपती मंदिर देवगड किल्ला या ठिकाणी मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वा. अभिषेक व पूजन सकाळी८ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी १० वाजता महाआरती सकाळी ११ वाजता सुश्राव्य स्थानिक भजने, १२ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा. माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणपती मंदिर न्यास देवगड किल्ला यांच्यावतीने करण्यात आले आहे.