देवगड कॉलेज नाका येथे आम. भास्कर जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी….

आम. भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे कॉलेज नाका येथे दहन…

देवगड,दि.०७ फेब्रूवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंपर्क अभियानांतर्गत कणकवली येथील जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी देवगड कॉलेज रोड येथे जाहीर निषेध करत भास्कर जाधव यांचा पुतळ्याचे दहन केले. नीम का पत्ता कडवा है भास्कर जाधव…., या भटक्या कुत्र्याचं करायचं काय नसबंदी शिवाय पर्याय नाय! अशा घोषणा देत कॉलेज रोड परिसर दुमदुमून सोडला होता.

भाजपा जेष्ठ नेते बाळा खडपे,प्रकाश राणे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेवक शरद ठुकरूल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, युवा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर,महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, तन्वी शिंदे मकरंद जोशी ,अजित राणे, संदीप नाईकधुरे,संजय लाड, उत्तम बिर्जे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.