हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंचे यश

 वेंगुर्ला,दि.०७ फेब्रूवारी

वेंगुर्ला हायस्कूलमध्ये अॅन्थोनी कॉरनिओ यांच्या अधिपत्याखाली कराटे परीक्षा घेण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.

यात व्हाईट बेल्टमध्ये सार्थक भाटकर, वेदांत टेमकर, सुशांत वेंगुर्लेकर, स्वरा सापळे, शुभ्रा राऊळ, निशिगंधा खानोलकर, गिरीश वाघ, प्रसन्ना बर्वे, प्रणव केळुसकर, आर्यन शेळके, गौरांग गवाणकर, भार्गवी केळुसकर, रेड बेल्टमध्ये आर्यन शेळके, गौरांग गवाणकर, श्रीयांश सावंत, अमेज तोरस्कर, सार्थक भाटकर, येलो बेल्टमध्ये सान्वी काकडे, भूमि परुळेकर, शर्व आपटे, स्वदिप उकिडवे, उज्वल तांडेल, निरज खारोल, ऑरेंज बेल्टमध्ये गौरी वाडकर, दिव्यंका लटम, भूमिका घाडी, कोमल घाडी, मयंक नंदगडकर, स्वदीप उकिडवे, पृथा जोशी, नीरज खारोल तर ब्ल्यू बेल्टमध्ये रूशील धुरी यांचा समावेश आहे.

या कराटेपटूंना आसोली हायस्कूलच्या मुख्याध्यापक भावना धुरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर व प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.