सावंतवाडी,दि.०७ फेब्रूवारी
इश्काची नौका असे हेडींग देऊन सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात व्हेलांटाइन डे च्या निमित्ताने कोण प्रेमी युगुलांना घेऊन प्रेमाचे चाळे करुन पैसा कमावत असतील तर प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनांनी अशा संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या कार्यक्रमाला प्रखर विरोध केला पाहिजे , आयोजकांनी आताच या कार्यक्रमाचा गाशा गुंडाळावा असे मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी सावंतवाडी येथील शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये इश्काची नौका व्हॅलेंटाईन,थीम ड्रेस कोड. बॉलीवूड, अशा प्रकारची जाहिरात बाजी करून कपल्स १५०० रुपये बॉईज ७०० गर्ल्स ६५० ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स २१००.ग्रुप ऑफ थ्री बॉईज १९०० असा रेट ठरविण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी हा कार्यक्रम शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये सूरु होणार आहे, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात व्हेलांटाइन डे च्या निमित्ताने अशा प्रकारे प्रेमाचे फवारे कोण उडवू पाहत असेल तर पैसे कमवून आपली युवा पिढी बरबाद करणाऱ्या आयोजकांना याचा लाभ विचारून व्हॅलेंटाईन डे चे असे कार्यक्रम बंद पाडले पाहिजेत यासाठी समस्त हिंदू संघटनांनी एकत्र येत याला कडाडून विरोध केला पाहिजे असे केसरकर यांनी म्हटले आहे