नमो चषक तर्फे आयोजित तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. ४ रोजी जिमखाना मैदानावर संपन्न

 सावंतवाडी,दि.०७ फेब्रूवारी
नमो चषक तर्फे आयोजित तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा रविवार दिनांक ४ रोजी जिमखाना मैदानावर संपन्न झाल्या .या स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ . ९ तील कु . जिहान रिझवान मेमन याने उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक व इ . ८वी तील कु. फुदेल हसन आगा याने द्वितीय क्रमांक मिळवला . नमो चषक तर्फे कु. जिहान यास चषक व रोख रक्कम रु . २००० व कु . फुदेल यास चषक व रोख रक्कम रु . १००० देऊन गौरविण्यात आले.
सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.