लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित

सावंतवाडी,दि.०७ फेब्रूवारी
सावंतवाडीला लेदरबॉल क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. सावंतवाडीत पूर्वी नगरराध्यक्ष चषक, संजय गांधी स्मृती चषक आयोजित केल्या जायच्या. त्यात मुंबई, गोवा, सातारा, बेळगाव मधील नामवंत संघ सामिल होत असत. अशा दर्जेदार स्पर्धा होत नाहीत. ही उणीव भरुन काढण्यासाठी व सिंधुदुर्गातील लेदर बॉल क्रिकेटचा पूर्व वैभव प्राप्त होण्यासाठी एसएनआरआर ग्रुप आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा दि. २३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्रवेश दिला जाणार आहे.

या स्पर्धेत प्रत्येक संघाला किमान ३ सामने खेळण्यास मिळतील. ही स्पर्धा ४ गटामध्ये साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल, गटविजेता संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक – 1 लाख 25 हजार तर द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये शिवायमालिकाविर, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज अशी पारितोषिके आहेत. तरी सहभागी होऊ इच्छीणाऱ्या संघांनी आपली नावे नोंदणी करावी.संतोष व. केनवडेकर,रघुनाथ धरणावर,नॉर्बट माडतीस,राजन नाईक यांच्याजवळ करावी.