“अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..”म्हणणाऱ्यांना ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ..

भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांची उडवली खिल्ली ; मंत्री दीपक केसरकर यांचे आरोप खरेच

कणकवली, दि.०७ फेब्रूवारी(भगवान लोके)

अपेक्षे प्रमाणे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि घामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला,त्या अजित पावर यांना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना हा निर्णय सुखावणारा होता तसा तो संजय राऊतला आनंद देणारा आहे.”अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..” अस म्हणणाऱ्या सुप्रिया ताईला अकेला फडणवीस काफी है.. हे समजलं असेल.ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ त्यानेच तुमच्यावर आणली असे म्हणत भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांची खिल्ली उडवली.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्ली मधील घरी संजय राऊत मफलर घालून नाचला असेल.दुसऱ्यांची घर फोडणे, आग लावण्याचे एकमेव काम संजय राऊत करतो. राजसाहेब आणि उद्धव यांच्यात वाद लावले,ते घर फोडले,पक्ष फोडला,आता शरद पवार यांच्या घरात आग लावून पक्ष फोडला. भांडुप चा हा शकुनी मामा सर्वांच्या घरात वाद लावत आहे. आता काँग्रेस पक्ष त्याचे टार्गेट आहे.कोल्हापूर चे छत्रपतींच्या घरात काड्या लावत आहे.जो बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही तो कोणाचाच होणार नाही.आता त्याचा काँग्रेस वर डोळा आहे. आता संजय राऊत कोल्हापूर च्या छत्रपती घराण्यात वाद लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.राज्यसभेची ६ जागा छत्रपती संभाजी राजे यांना द्यावी,अशी चर्चा चालू असताना त्याच्या वडिलांचे नाव चालविण्याचे काम हा संजय राऊत करत आहे.आधी ठाकरे आणि आता पवार यांच्या घरात यशस्वीपणे वाद लावलेत. अशा या माणसाला कोणी घरात घेऊ नये त्याची ती लायकी नाही .ज्यांनी स्वतःच्या हातानी मालकाचा पक्ष संपवला तो दुसऱ्याचं भल कस करणार असा सवाल नितेश राणे यांनी केला.

महाराष्ट्राच्या जनतेच्या विरुद्ध जाऊन गद्दारांचा खजिना महाविकास आघाडीने निर्माण केला होता.मुघलांचे वंशज व औरंग्याच्या पिल्लांनी आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. असे सांगतानाच हिंदुत्वाच्या विचाराचे सर्व पक्ष एकत्र येत असतील तर मनसेनेने स्वागत आहे. निर्णय पक्षश्रेष्ठीं घेतील. राज साहेब ठाकरे यांचा डीएनए हिंदुत्वाचा आहे त्यामुळे त्यांचे स्वागतच होईल.
मंत्री केसरकर जे बोलले त्याला माझं समर्थन आहे. उद्धव ठाकरे पदासाठी व आमदारकी साठी पैसे घेतात हा आरोप केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रंगशारदा येथील बैठकीत केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे बिकावू आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.कोकणातील जनता उद्धव ठाकरेंना आपला कुटुंब प्रमुख मानात नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल,असे आमदार नितेश राणे सांगितले.