देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची मुंबई उपनगर अंधेरी येथे बदली

देवगड दि.७ फेब्रुवारी

देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली झाली आहे.त्यांची मुंबई उपनगर अंधेरी येथील संजय गांधी योजना तहसीलदारपदी बदली झाली आहे.

तहसीलदार यांची ही पवार बदली प्रशासकीय असून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये त्यांनी सलग चार वर्षे काम केले होते. कणकवली तहसीलदार म्हणून त्यांनी सलग तीन वर्षे कामकाज पाहिले होते. उत्कृष्टकामकाजाबाबत पवार यांचा सत्कार करण्यात आला होता. प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा जनतेशी चांगला संवाद होता. त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख होती.देवगडमध्येही अल्पावधीतच त्यांनी येथील जनतेशी चांगला सुसंवाद साधत देवगड तहसीलदार कार्यालयातील प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणली होती.