नांदगाव वाशिनवाडी येथील सुनंदा परब यांना संजय देसाई बांधून दिलं घर..

आ.नितेश राणेंच्या हस्ते गृहप्रवेश ; नांदगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

कणकवली दि.७ फेब्रुवारी(भगवान लोके)

नांदगाव येथे विविध विकासकामांची भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली.तसेच काही रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले.नांदगाव वाशिनवाडी येथील सुनंदा परब यांना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी घर बांधून दिले,त्या घराचे फित आ.नितेश राणेंच्या हस्ते कापून गृहप्रवेश करण्यात आला.

यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे मंडळ तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे,रज्जाक बटवाले, माजी उपसरपंच निरज मोरये, आयनल माजी सरपंच बापू फाटक,कासार्डे सरपंच सौ.नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,तोंडवली बावशी उपसरपंच दिनेश कांडर , नांदगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर मोरये, नमिता मोरये, हरिश्चंद्र बिडये,बबन मोरये आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये नांदगाव बिडयेवाडी येथून रवळनाथ मंदिर पर्यंत जात असलेला रस्ता, सिसयेवाडी रस्ता, नांदगाव मधलीवाडी ते रामेश्वर मंदिर पर्यंत जाणारा रस्ता ,आणि तसेच नांदगाव वाशिनवाडी वाडी येथील सुनंदा परब या आजीचे या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या पुढाकाराने बनवलेल्या सुंदर असे घराचा गृहप्रवेश आमदार नितेश राणे यांचे हस्ते करण्यात आला.

परब आजीला मिळाले हक्काचे सुंदर घर

नांदगाव वाशिनवाडी येथील श्रीमती सुनंदा परब ही आजी आपल्या घरात एकटीच राहत आहे .मागील काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. तिला कोणाचाही आधार नसल्याने तिचे राहते घर अत्यंत मोडकळीस आले होते .ते घर ती दुरुस्त करू शकत नव्हती. अशा अवस्थेतही त्या घरात ती कशीबशी राहत होती. कित्येक वेळा याबाबत तिने ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्नही केले. परंतु काही जाचक अटीमुळे तिच्या घराला मंजूरी मिळू शकलेली नाही .याबाबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी कासार्डे जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय देसाई यांना सदर घराबाबत माहिती दिली.संजय देसाईंनी तात्काळ सदर घर आपण पुढाकार घेऊन स्वखर्चाने उभारणार अशी ग्वाही देत काही महिन्यातच सुंदर असं घर उभं केले. त्या घराचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी परब आजीने सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांना भोजनाला आमंत्रण दिले आहे. संजय देसाई यांचे विशेष आभार मानले आहे.

Google search engine