मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंती उत्सव!

मसुरे,दि.७ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)

मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिर येथे १२ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने “माघी श्री गणेश जयंती” उत्सव साजरा करण्यात येत आहे.
१२ फेब्रुवारी रोजी
सकाळी ०८.०० ते ०८.३० वा.श्री महागणपती पूजा व अभिषेक,सकाळी ८.३० ते १०.३० वा. लघुरुद्र, सकाळी ११.०० ते १२.३० वा. महाआरती व तिर्थप्रसाद, सायं. ०७.०० ते ०८.०० वा. सुश्राव्य भजने, रात्रौ. ०८.३० ते १०.३० वा. दिंडी व वारकरी भजन
(भगवती प्रासादिक वारकरी व दिंडी भजन मंडळ, चिंदर – भटवाडी).
१३ रोजी सकाळी ०८.०० ते ०९.०० वा.श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ९.०० ते १२.३० वा.श्री सत्यविनायकाची महापूजा,दुपारी १२.३० ते १.०० वा.महा आरती व तीर्थप्रसाद, ०१.०० वा. ते ३.०० वा. महाप्रसाद,
दुपारी ३.०० ते ६.०० वा.
हळदीकुंकू समारंभ,
सायं. ७.०० वा.सुश्राव्य भजने – श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे – मार्गाचीतड बुवा. श्री.
अमित बागवे,
रात्रौ. ९.०० वा.लिंग पावणाई रवळनाथ पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ, कसाल यांचा महान पौराणिक नाठ्य प्रयोग “माया मच्छिंद्र अर्थात दत्तदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.