जिल्हांतर्गत बदली संदर्भात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना .दिपक केसरकर शिक्षक संघटनेने यांची घेतली भेट

सावंतवाडी,दि.७ फेब्रुवारी
जिल्हांतर्गत बदली संदर्भात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना .दिपक केसरकर शिक्षक संघटनेने यांची भेट घेतली . पवित्र पोर्टल सुरू होऊन भरती प्रक्रिया सुरू झाली . त्यामुळे जिल्हांतर्गत बदली या विषयासाठी तातडीची भेट आज घेतली
मागील बदलीमधील विस्थापित, अवघड क्षेत्रामधील ,बदली पात्र शिक्षक व विशेष कारणांनी विनंती बदली शिक्षक प्रतिक्षेत आहेत. याबाबत सविस्तर चर्चा केली . या संदर्भातील शासन आदेश झालेले असूनही कार्यवाही झालेली नाही ही बाब निदर्शनास आणून दिली . भरतीच्या पूर्वी या बदल्या होण्यासाठी विनंती करण्यात आली .सदर भेटीचे वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ( प्राथ) उपास्थित होते .
या भेटीसाठी श्री म .ल. देसाई .श्री राजा कविटकर , श्री बाबाजी झेंडे , श्रीम .वंदना सावंत , श्री नरेंद्र सावंत , श्री . प्रमोद पावसकर , श्री . संजय शेडगे , श्री . संतोष गवस , श्री. उमेश म्हाडगुत , श्री . सुरेंद्र विरनोडकर श्री लक्ष्मण बरागडे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.