अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी;राम भक्तांसाठी अयोध्या वारी घडविण्यास आ. नितेश राणे यांनी दिली मोफत सेवा
कणकवली दि .७ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदार संघातुन २३८ रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीतून रामभक्तांना अयोध्या वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार श्री. नितेश राणे
यांनी मतदार संघातुन अयोध्ये साठी जाणाऱ्या राम भक्तांसाठी मोफत सेवा दिली आहे. दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता नांदगाव ते पनवेल लक्झरी गाडी सोडली आहे. तसेच प्रवासामध्ये अत्यावश्यक लागणारी औषध, थंडी वाऱ्याचे साहित्य आपल्या सोबत घ्यावयाचे आहे.