तळेरे,दि.७ फेब्रुवारी
कधीही दुसऱ्याला त्रास होईल असे काम करू नका.सर्वजण कायद्या समोर समान आहेत.कायदा सर्वांना लागू आहे.घटनेतील अधिकार आणि नियम याची सर्व माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.मग सामान्य व्यक्ती असो नाही तर अन्य कितीही मोठी व्यक्ती सर्वाना समान न्याय हे आपली घटना सांगते. शक्यतो आपण कोर्टाची पायरी चढूच नका. त्यात पैसा,वेळ विनाकारण खर्च होतो. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वांनाच असली पाहिजे.त्यासाठी प्रत्येकाने ग्राहक म्हणून सजक राहिले पाहिजे. महिलांनी तर जास्तच काळजी घेतली पाहिजे.फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात न्याय मागू शकता.सर्वात जलद आणि न्याय मिळवून देणारा ग्राहक संरक्षण कायदा आहे.स्वत:साठी जगतांना आपण दुसऱ्यांसाठी जगूया हे सेवेचे व्रत घेऊन समाजातील, तळागाळातील गरजूंना त्यांचे न्याय,हक्क मिळवून देऊयात. हेच खरे ह्यूमन साईटचे कार्य आहे.तेच सर्वांनी एकजुटीने करुयात हीच खरी ईश्वरी सेवा आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र पैलवान यांनी केले.
मानव हक्क व संरक्षण तत्वाची माहिती तळागाळातील सर्व जनतेपर्यंत पोहोचावी आणि आपल्या भारतीय संविधानाने दिलेल्या न्याय हक्काची जागृती व्हावी या उद्देशाने गेली चार वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरातील जनतेला,पिडितांना तसेच अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. या संघटनेचा चौथा जिल्हा मेळावा व कार्यशाळा नुकतीच मालवण जवळच्या कोळंब येथील समर्थ हाॅल येथे आयोजित करण्यात आली होती.
यजमान मालवण तालुका ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन यांचे आयोजन असलेल्या या मेळाव्याचे अध्यक्ष वित्त व न्याय विभागाच्या ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड.राजेंद्र पैलवान होते. तर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले हे प्रमुख उद्घाटक होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, मेडिक्लेम व एम.एस.ई.बी.विभाग प्रमुख डाॅ.अमोल धर्मजिज्ञासू होते. तर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मंदार काणे हे विशेष उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळी प्रथम सर्व मान्यवरांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले व पारंपारिक तुतारीने विशेष मानवंदना देण्यात आली.
या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यानंतर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ़भाई पीरखान व संतोष नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र पैलवान यांचा सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.युवराज लखमराजे भोसले यांचा स्वागत सत्कार जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी केला. जिल्हा सचिव अर्जुन परब यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला. तन्वीर खतिब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कठारे यांचा स्वागत सत्कार केला. डाॅ.अमोल धर्मजिज्ञासू यांचा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांनी सत्कार केला. राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर यांचा सत्कार मालवण तालुका सचिव राजेश लब्दे व देवगड तालुका सचिव महेंद्र देवगडकर यांनी केला. राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम यांचा सत्कार मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभूखानोलकर व कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे यांनी केला. राज्य सचिव राकेश शिंदे यांचा सत्कार सावंतवाडी कार्याध्यक्ष सौ. मोहिनी माडगावकर व गोवा राज्य संघटक सौ.बांदेकर यांनी केला.
ॲड.राजेंद्र पैलवान यांनीह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटना व मालवण तालुका संघटनेच्या कार्यांची प्रशंसा केली. तसेच कायदा, मानवता, दैनंदिन जीवन, ग्राहक हक्क, विमा अधिकार आणि विविध घटकांसाठी घटनेतील दिलेल्या मूलभूत हक्क व कमलांची माहिती दिली तसेच उपस्थित सर्वांशी प्रश्नोत्तरे व संवाद साधला.
उद्गाटक लखमराजे भोसले:-
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्गाटक लखमराजे भोसले यावेळी संबोधीत करतांना म्हणाले की, ह्यूमन राईट असोसिएशन या संघटनेचे अतिशय उत्तम कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. या संघटनेच्या कार्यात मदत करायला निश्चितच आवडेल.सामाजिक बांधिलकीतून सगळ्या क्षेत्रात काम करत असतांना आम्हाला देखील यात सहभागी करून घेतलात तर निश्चितच आनंद होईल. महिलांना सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.तर महिला अधिक सक्षम होऊन आपल्या कार्याचा निश्चितच चांगला ठसा उमटवतील असा विश्वास सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे:-
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, घटकांपर्यंत संघटनेचे कार्य पोहचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मानवाधिकार ही संघटना संपूर्ण भारतात कार्यरत आहे. प्रशासनाकडून अन्याय,अत्याचार,पिळवणूक यांच्यातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे चांगले कार्य ह्यूमन राईट या संघटनेची सिंधुदुर्गातील संपूर्ण टीम कोकणच्या लाल मातीत मोठ्या प्रमाणात करीत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. हे कार्य समुद्रासारखे अथांग आणि व्यापक व्हावे. ही संपूर्ण ताकद संघटनेच्या माध्यमातून आपल्या टीमला मिळणार आहे. असे गौरवोद्गार ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे यांनी काढले.
पद्मश्री परशुराम गंगावणे:-
यानंतर प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी आपल्या भाषणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या कार्यपद्धतीची व कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची विशेष प्रशंसा केली.संघटनेच्या निस्वार्थी व प्रामाणिक कार्याचा गौरव केला.तसेच हे कार्य अधिक जोमाने चालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर डाॅ.अमोल धर्मजिज्ञासू, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम या मान्यवरांनी उपस्थित सर्वांना ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या कामाची माहिती देत संबोधीत केले.
त्यानंतर जिल्ह्यातील कला, सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देऊन कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तीना सन्मानित करण्यात आले. यात राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त नंदन घोगळे, सिंधू रनर टीमचा जागतीक धावक ओंकार पराडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.मीनल पार्टे, सत्यात्तर वेळा रक्तदान केलेले रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर, ४६ वेळा प्लेटलेटचे दाता यशवंत गावडे, सिंधुयुवा उद्योजक पुरस्कार प्राप्त मंगेश चव्हाण, सर्पमित्र व रक्तमित्र महेश राऊळ, तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजू जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, सौ.श्रावणी मदभावे माजी नगरसेविका जयमाला मयेकर, प्रणय बांदिवडेकर, समर्थ मंगल कार्यालयाचे संचालक प्रवीण सावंत यांचा इतर अन्य व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
या दरम्यान अपंग बांधव तसेच ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींनी संघटनेबद्दल आपले सकारात्मक अनुभव सांगितले आणि कृतज्ञता व्यक्त केली.याच दरम्यान कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांचे वडिल निवृत्त शिक्षक श्री नाईक यांचा तसेच संतोष नाईक यांची सलग तिसऱ्यांदा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर होताच उपस्थित सर्वांनी त्यांचे टाळ्यांचा गजरात अभिनंदन केले. तसेच त्यांना त्याबाबतचे नियुक्ती पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
या मेळाव्याच्या उद्गाटन सोहळा व सत्कार या नंतर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न झाली.
मालवण मधील या मेळाव्याला ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे जिल्हाभरातील पदाधिकारी, सदस्य व मालवणमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याला कणकवली तालुकाध्यक्ष सौ.संजना सदडेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके, देवगड तालुकाध्यक्ष आशिफ मुल्ला, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी,कुडाळ तालुकाध्यक्ष सौ.संजना सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तन्वीर खतीब, कणकवली कार्याध्यक्ष हनीफभाई पीरखान, मालवण कार्याध्यक्ष सुभाष खानोलकर, सावंतवाडी कार्याध्यक्ष सौ. मोहिनी मडगांवकर, मालवण तालुका सचिव राजेश लब्दे, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर, सहसचिव महेश मयेकर, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, मालवण तालुका महिला संघटक मुक्ता रजपूत तसेच सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष मंदार काणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा खजिनदार संजय शेळके, जिल्हा निरीक्षक मानसी परब, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय खानविलकर, जिल्हा महिला संघटक सौ.मिलन पार्टे, जिल्हा महिला संघटक सौ.शिवानी पाटकर उपस्थित होत्या.
तर निलेश पवार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर शेवटी आभार सुधीर धुरी यांनी मानले.