कुडासे वानोशी धनगरवाडी येथील नळयोजना ताब्यात घेण्यास येत असलेल्या अडचणी बाबत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने सरपंच सदस्य ग्रामस्थ यांचे उपोषण स्थगित

दोडामार्ग, दि. ७ फेब्रुवारी

कुडासे वानोशी धनगर वाडीतील नळ योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत असून शासन निर्णय 2020 नुसार ताब्यात घेण्यास अडचणी येत असल्याने आपल्याकडे वेळोवेळी मार्गदर्शन बाबत पत्र व्यवहार करूनही मार्गदर्शन न दिल्याने मंगळवारी कुडासे सरपंच सदस्य ग्रामस्थ यांनी दोडामार्ग पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले. येथील गट विकास अधिकारी निवडून प्रक्षिक्षणासाठी गेले. असे सांगण्यात आले. इतर अधिकारी कर्मचारी यांनी चर्चा केली. यावेळी सरपंच ग्रामस्थ यांनी रेकार्ड दिले जात नाही त्या इसमावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करीता सुरू केलेले उपोषण उपोषण ज्या कारणासाठी केले या संदर्भात वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन मागवले आहे. असे लेखी पञ दोडामार्ग पंचायत समिती कडून दिल्याने सरपंच ग्रामस्थ यांनी उपोषण पंधरा दिवसासाठी स्थगित केले.

वानोशी धनगरवाडी नळ योजनेबाबत ग्रामपंचायत कार्यालयातील उपलब्ध कागदपत्रानुसार असे दिसून येते की सन 2011 पासून ही नळयोजना ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता समितीमार्फत सुरू आहे. कागदपत्रांचे अवलोकन करता, वस्तुस्थिती निहाय समितीकडे नळ लाभधारकांचे अनामत रक्कम, बैंक खाते, कॅशबुक, रोजकीर्द, पाणीपट्टी वसुली पावती बुक या कोणत्याही बाबी दिसून येत नाहीत. लाभ धारकाकडून अनामत रक्कम, पाणीपट्टी दिल्याचे दिसून येते. एकंदरी शासकीय नियमानुसार वरील बाबी ठेवणे हे पाणी समितीचे कर्तव्य आहे. परंतु सदर बाबी ठेवण्यात आल्या नाहीत संबंधित समितीचे अध्यक्ष / सचिव यांना दोन वेळा स्मरणपत्र व एक वेळा नोटीस देण्यात आली. परंतु पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांकडून कोणताही खुलासा किंवा उत्तर आले नाही.दोडामार्ग पंचायत समिती येथे उपोषणात सरपंच सौ. पूजा बाबाजी देसाई, राजाराम देसाई, सदस्य, प्रसाद कुडासकर, सदस्य, रामदास मेस्त्री, बाबाजी हरी देसाई, संतोष पिळगांवकर, मिलिंद जाधव, उल्हास देसाई, गंगाराम खरवत, आत्माराम देसाई, मधुकर जाधव, इतरांनी उपोषण केले होते.