कित्येक वर्षानंतर वाहन धारकांना चांगले रस्ते ,उर्वरित कामे एक दोन महिन्यात पूर्ण -संभाजी घंटे
दोडामार्ग, दि. ७ फेब्रुवारी
सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या ताब्यात असलेले दोडामार्ग तालुक्यातील तसेच दोडामार्ग शहरातील रस्ते डांबरीकरण करण ते गुळगुळीत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात काही रस्ते वगळता दोडामार्ग ते बांदा दोडामार्ग ते विजघर, दोडामार्ग ते पणजी ही कामे पूर्ण झाली आहेत. दोडामार्ग बस स्थानकापासून सुरुची वाडी बांधकाम कार्यालय तसेच लोकवस्ती दरम्यान जाणारा रस्ता बांधकाम विभाग यांनी पूर्ण केला आहे. माटणे ते आयी दरम्यान काही रस्ता गॅस पाईप लाईन मुळे थांबला होता ते एक दिड महिन्यात पूर्ण केला जाणार आहे.शाखा अभियंता अनिल बडे सहायक शाखा अभियंता संभाजी घंटे यांच्या प्रयत्नामुळे दोडामार्ग तालुक्यातील रस्ते पुन्हा एकदा चकाचक झाले आहेत. बांधकाम विभाग यांच्या कामगिरी बद्दल आता समाधान व्यक्त केले जात आहे.