भाजप सरकार जनतेच्या पैशावर जाहिरातीमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड,दि. ७ फेब्रुवारी
राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी आंदोलनाच्या नावाखाली अटक केली असून देशांमध्ये सध्या चाललेल्या हुकूमशाही विरोधात व भ्रष्टाचार विरोधात जनतेमध्ये प्रचंड दोष आहे भाजप सरकार जनतेच्या पैशावर जाहिरातीमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत असून या जाहिरातींमध्ये भारत सरकार ऐवजी मोदी सरकारचा उल्लेख होत आहे या जाहिरातीवर भारत सरकार असा स्टिकर लावून संताप व्यक्त केला .म्हणून भाजप सरकारने कुणाल राऊत याना अटक केली आहे सरकारने अनैतिक बेकायदेशीर, संविधानिक केलेल्या अटक तानाशाही स्वरूपाची आहे या सर्व गोष्टींचा गोष्टींना युवक काँग्रेसचा विरोध असून सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचा आवाज आपल्या शासनापर्यंत पोहोचवावा. अशी मागणी लेखी पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर युवक प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश सिद्धेश परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर. देवगड तालुकाध्यक्ष सुरज घाडी वेंगुर्ल्याचे विशाल गावडे प्रथमेश शिरोडकर अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते