श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी आयोजित माघी गणेशजयंती उत्सव १३ फेब्रुवारी रोजी

देवगड, दि.७ फेब्रुवारी
श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी आयोजित माघी गणेशजयंती २०२४ गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा निमित्त मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी श्री गणेश मंदिर असलदे उगवतीवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त स.९.३० ते १० गणेश पूजन ,स.१०वा. सामुहिक अभिषेक, स.१०.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा स.११.३० वा. महाआरती दु.१ ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद ,दु.३.ते ४ वा. पर्यंत हळदी कुंकु समारंभ सायं ४ ते ७ वा. पर्यंत खेळ पैठणीचा ,साय ७ ते ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रौ १० वा .नंतर दिंडी वारकरी भजने या कार्यक्रमांना उपस्थित रहावे.असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी यांनी केले आहे.