विवाहित तरुणाने धमकी देत युवतीवर केला लैंगिक अत्याचार

संशयित आरोपींविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; प्रेम करीत लग्नाला नकार,पुन्हा अत्याचार..

कणकवली दि.७ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील एका युवतीला धमकी देत मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका विवाहित तरुणावर त्या पीडित युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, युवती व त्या तरुणाची गेल्या वर्षापूर्वी मैत्रीतून प्रेम संबंध झाले होते. त्यानंतर त्या युवतीने लग्नासाठी विचारले असतात त्या तरुणाने होकार दिला. त्यानंतर काही दिवसाने त्याने नकार दिला.त्यानंतर त्या तरुणाने दुसऱ्या मुलीशी विवाह केला.विवाह झाल्यानंतर काही महिन्याने ती युवती व तो तरुण कामानिमित्त कणकवलीत आले असता त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मोबाईलवर संभाषण होऊ लागले. त्या तरुणाने एका कणकवली शहरातील लॉज वर घेवून जात युवतीवर अत्याचार केला.संशयित आरोपीने पीडित युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला.त्यानुसार पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करत आहेत