शाहिर नंदेश उमप यांच्या गायनाने सावंतवाडीकर रसिक तल्लीन

लोकगीतांचा नजराणा : रसिकांवर गारुड

सावंतवाडी, दि.७ फेब्रुवारी
गण, गवळण, गोंधळ, भारुड, बतावणी आणि पोवाडा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथेचे सादरीकरण या कार्यक्रमांनी सावंतवाडीकर रसिक तल्लीन झाले. निमित्त होते ते शाहीर नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या कार्यक्रमाचे.
सावंतवाडी येथील स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध मराठी गायक
शाहीर नंदेश उमप व त्यांच्या ३५ जणांच्या संचासह महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा सादर करण्यात आली. गायन व नृत्य यांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना आनंदाची पर्वणी मिळाली.