शासकीय रेखाकला परीक्षेत शेठ म. ग. हायस्कूल , देवगडची राज्ञी विवेक कुळकर्णी राज्यात ४१ वी

देवगड, दि.७ फेब्रुवारी
शेठ म. ग. हायस्कूल , देवगड चा शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा व एलिमेंटरी ग्रेड परीक्षा २०२३ चा निकाल शंभर टक्के लागला असून कु. राज्ञी विवेक कुळकर्णी हीने एलिमेटरी ग्रेड परीक्षेत राज्यात ४१वा क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिला पालकां समवेत प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षक सुनिल घस्ती, कलाशिक्षक राजेंद्र कोयंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी A ग्रेड – ०६ , B ग्रेड – २५, C ग्रेड – १५ असे एकूण सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल आहे. A ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यामध्ये आर्या विनोद चौगुले , महेक अब्दुलाह खान, सारा जावेद खान, मधुरा प्रताप खवळे , भूमिका भिसाजी खवळे , तन्वी तुकाराम तेली तर B ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यामध्ये आर्या श्रीकांत अभ्यंकर , रुचिदा नितीन आळवे , आराध्य विशाल चौगुले, प्राजक्ता रामदास हडपीडकर , लावण्या प्रविण हिर्लेकर , प्रणव सुरेंद्र कदम , आर्या संतोष कणेरकर , श्रेया प्रसाद खडपकर ‘ धनश्री प्रशांत कुळकर्णी , युवराज प्रसाद मांजरेकर , गंधार निलकंठ मराठे , निषाद निलकंठ मराठे , विघ्नेश धनेश मेस्त्री , मैत्री उमेश मोहिते ,हर्षल अनंत नारकर ,रिग्वेद राजेश निकम , आर्या देविदास कुबल , नित्या मंगेश पेडणेकर , नेहा विद्याधर पेठे , अनुष्का प्रशांत पोकळे , मधुरा संजय तारकर , चिन्मया उमेश ठाकूर , सोहम संतोष यादव , मंदार जितेंद्र करंगुटकर व सलोनी निलेश नाईकधुरे
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा २०२३ मध्ये एकूण ५४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . या पैकी A ग्रेड प्राप्त – ०७, B ग्रेड प्राप्त – १७, C ग्रेड प्राप्त – ३० असे एकूण सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के आहे . A ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यामध्ये दिया गणेश गावकर , मधुरा धोंडू कदम , शशांक शैलेश खाडिलकर , राज्ञी विवेक कुळकर्णी , दिक्षा विवेक मेस्त्री , योगिनी संजय मेस्त्री , मयुर दिनेश नाटेकर , B ग्रेड प्राप्त विद्यार्थी दुर्वांकुर दिपक दळवी , आर्यन रामदास हडपिडकर , सान्वी शामू जंगले , भार्गवी अजित कदम , जान्हवी सतिश कदम , श्रावणी विनोद कदम , भाग्यवी प्रविण खडपकर ‘ नंदन नितीन कोयंडे , यज्ञेश प्रदिप पांचाळ , सोनिया मोहन पाटील , पल्लवी विद्याधर पेठे , संस्कृती संदिप राणे , किमया धनंजय सारंग , अलिजा तौफिक शेख , शर्वरी गणपती शेडबाळे , श्रवण विनोद तेली व मुस्कान रिजवान खान या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थाचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे , पर्यवेक्षक सुनील घस्ती , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.