कृषि विभागाने तातडीने संभाव्य नुकसानीचे पंचनामे करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करा….

ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडे मागणी….

देवगड,दि.०८ फेब्रुवारी

कृषि विभागाने तातडीने
संभाव्य नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगुन त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यास सांगावे.त्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळू शकेल. तातडीने कृषि विभागाकडून सर्वेक्षण अहवाल मागवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,सध्या तालुक्यातील आंबा, काजू पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. झाडांना आलेल्या मोहोरावर फुलकिडीचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव वाढला आहे. याच्या नियंत्रणासाठी महागडी औषध फवारणी करूनही त्याला आळा बसत नसल्याने देवगड तालुक्यातील शेतकरी हवालदीन झाले आहेत. त्यामुळे यंदा अजून आंबा
उत्पादनाचा पत्ता नाही आणि फवारणीवर होणारा वाढीव खर्च यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे देवगड तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांचे मोठे
नुकसान झाले होते. त्यानंतर आंबा, काजू कलमे मोहोरण्यास सुरूवात झाली होती. मात्र मोहोरावर मोठ्या
प्रमाणात फुलकिडीचा (थ्रीप्स) ॲटॅक वाढला आहे. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी महागडी औषध फवारणी करूनही अपेक्षित फरक दिसत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार पुरते हैराण झाले आहेत. यासाठी झालेल्या आंबा, काजू पीकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. यामुळे कृषि विभागाला तातडीने
संभाव्य नुकनीचे पंचनामे करण्यास सांगुन त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यास सांगावे.त्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळू शकेल.तातडीने कृषि विभागाकडून सर्वेक्षण अहवाल मागवण्यात यावा अशी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांची मागणी आहे.

यावेळी दिवाकर परब, निलेश पेडणेकर, प्रकाश गुरव,उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर शामकांत शेडगे,नागेश आचरेकर बाबू वाळके, ज्ञानदेव भडसाळे, जयराम कदम, संतोष पारकर, शांताराम गायकवाड, मंगेश पेडणेकर, दीपक आचरेकर,सुदेश मुंबरकर, शेखर धुरी, योगेश शिंदे,अनिल घाडी, शेखर धुरी, पांडुरंग घाडी,योगेश शिंदे,चंद्रकांत फाळके,संतोष पारकर, सुदेश बने, निकेश गुरव,अनिल घाडी,सुशांत घाडी,विद्याधर तांबे, शांताराम गायकवाड,शरद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.