तळेरे,दि.०८ फेब्रुवारी
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष भिवा नाईक यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
संतोष नाईक यांनी यापूर्वी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. त्यांनी संघटनेची संपूर्ण जिल्ह्याभरात संघटन बांधणी केली. याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच संघटनेच्या कार्यासाठी दिलेले भरीव योगदान आणि सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. संतोष नाईक यांनी यापूर्वी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावरती चांगली कामगिरी करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटना बांधणी करण्याचे काम केले. त्याबरोबर संघटनेच्या माध्यमातून विविध विषयांवरती आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.तसेच ते रिक्षा,टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या कोकण विभागाचे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संघटनेच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान आहे.
याबाबतच्या फेरनिवडीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे यांनी मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मेळाव्या प्रसंगी केली. त्याबाबतचे नियुक्ती पत्र कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष- खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव- प्रमोद केसरकर महाराष्ट्र राज्य सचिव- राकेश शिंदे, राज्य निरीक्षक- घन:शाम सांडीम,ॲड.राजेंद्र पैलवान,डॉ.अमोल धर्मजिज्ञासू,जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
संतोष नाईक यांची सलग तिसऱ्यांदा फेर निवड झाल्याबद्दल त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.