तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली…

ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान

 देवगड,दि.०८ फेब्रुवारी

देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली झाली आहे.त्यांची मुंबई उपनगर अंधेरी येथील संजय गांधी योजना तहसीलदारपदी बदली झाल्याने ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तहसीलदार पवार यांची ही बदली प्रशासकीय असून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये त्यांनी सलग चार वर्षे काम केले होते. कणकवली तहसीलदार म्हणून त्यांनी सलग तीन वर्षे कामकाज पाहिले होते. उत्कृष्टकामकाजाबाबत पवार यांचा सत्कार करण्यात आला होता. प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा जनतेशी चांगला संवाद होता. त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख होती.देवगडमध्येही अल्पावधीतच त्यांनी येथील जनतेशी चांगला सुसंवाद साधत देवगड तहसीलदार कार्यालयातील प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणली होती.

यावेळी दिवाकर परब, निलेश पेडणेकर, प्रकाश गुरव,उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर शामकांत शेडगे,नागेश आचरेकर बाबू वाळके, ज्ञानदेव भडसाळे, जयराम कदम, संतोष पारकर, शांताराम गायकवाड, मंगेश पेडणेकर, दीपक आचरेकर,सुदेश मुंबरकर, शेखर धुरी, योगेश शिंदे,अनिल घाडी, शेखर धुरी, पांडुरंग घाडी,योगेश शिंदे,चंद्रकांत फाळके,संतोष पारकर, सुदेश बने, निकेश गुरव,अनिल घाडी,सुशांत घाडी,विद्याधर तांबे, शांताराम गायकवाड,शरद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.