जामसंडे शहर व्यापारी संघटनेच्या श्री सत्यनारायणाची महापुजा ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन

महाराष्ट्रातील एकमेव महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य “मुद्रा भद्राय राजते” गाथा शिवशाहीची हा कार्यक्रम

देवगड,दि.०८ फेब्रुवारी
जामसंडे शहर व्यापारी संघटनेच्या वतीने गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा गोगटे कंपाऊंड जामसंडे या ठिकाणी आयोजित केली असून या ठिकाणी देवगड चे उद्योगपती नंदकुमार घाटे यानी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले व जामसंडे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी याना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी.जामसंडे व्यापारी संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील ,प्रवीण जोग,शेखर तेली,उमेश कुळकर्णी, विजय पाटील ,संजय तारकर,भारत माने, बंडू लाड,व अन्य उपस्थित होते.या निमित्त श्री सत्यनारायण महापुजा ११ वाजल्यानंतर महाआरती व तीर्थप्रसाद, १२.३० ते ३ महाप्रसाद,, दु.३ ते ६ हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वा. परमपूज्य कलावती आई बालोपासना, सायंकाळी ७ ते ९ वाजता स्थानिक सुश्राव्य भजने ९.३० वा. महाराष्ट्रातील एकमेव महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य “मुद्रा भद्राय राजते” गाथा शिवशाहीची हा कार्यक्रम शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर निर्मित अत्याधुनिक साऊंड सिस्टिमसह २५ कलाकारांच्या संचात संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जामसंडे शहर व्यापारी संघटना व महिला व्यापारी संघटना जामसंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.