तोंडावरील बरणी काढून कुत्र्याला जीवदान

सावंतवाडी,दि.०८ फेब्रुवारी

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी कुत्र्याने प्लास्टीक बरणीत तोंड घातले. त्यामुळे त्याचे तोंडावर प्लास्टीकची बरणी घट्ट बसल्याने गेले चार दिवस कुत्रा तसाच पळत होता. सदरची बरणी काढण्यासाठी सबनीसवाडा येथील प्राणी प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. परंतु यश मिळत नव्हते. सदरची बाब मंगेश तळवणेकर यांना समजताच त्यांनी तातडीने प्राणी प्रेमी जिगरबाज नरु उर्फ नरेंद्र सावंत यांना घेवून सबनीसवाडा येथे धाव घेतली. सदर ठिकाणी निशांत तोरसकर, शैलेश नाईक, अरुण घाडी यांच्या मदतीने सदरची बरणी काढण्यासाठी प्रयत्न करत असता सदरचा कुत्रा भयंकर चवताळला होता. परंतु नरु उर्फ नरेंद्र सावंत यांने मोठ्या धिरोदत्तपणे कुत्र्याला पकडून त्याच्या तोंडावरील बरणी काढून कुत्र्याला जीवदान दिले.
कृपया तुम्ही घराबाहेर पाण्याचे भांडे पाणी भरुन व दोन घास आपल्या जेवणातले प्रत्येकाने या मुक्या प्राण्यांसाठी ठेवून त्यांचा जीव वाचवावा अशी विनंती माजी सभापती मंगेश तळवणेकर यानी केली आहे.