मालवण,दि.०८ फेब्रुवारी
मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ नजीकच्या इंदिरा कॉम्प्लेक्स मधील रहिवासी व सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शैलजा भालचंद्र पारकर (पूर्वाश्रमीच्या वासंती विष्णू कुमामेकर) (वय ८५) यांचे राहत्या घरी निधन झाले.
शैलजा पारकर यांचे बालपण व शिक्षण मालवणात झाले. शिक्षकी पेशा स्वीकारल्यावर त्यांनी पडवे, कवीलकाटा, वरदे, कडावल, ओरोस, हुमरमळा अशा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये शिक्षकी सेवा बजावली. पुरोगामी विचारसरणीच्या असलेल्या शैलजा यांचा मनमिळावू स्वभावमुळे लोकसंग्रहही मोठा होता. बुधवारी सायंकाळी चिवला बीच येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी केंद्रप्रमुख स्व. भालचंद्र पारकर यांच्या त्या पत्नी तसेच अनिता पारकर, स्वाती पारकर, मनीषा पारकर यांच्या त्या मातोश्री तर गौरी कुमामेकर यांच्या त्या आत्या व उद्योजक भूषण साटम यांच्या त्या मावशी होत.