कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र परशुराम उपरकर यांनी राज ठाकरे यांना दिले आहे .
दिलेल्या पत्रात म्हटले की,मी श्री. परशुराम उपरकर आपणास या पत्रा द्वारे कळवू इच्छितो की,मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सरचिटणीस या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा ही राजीनामा देत आहे.
आपणास विनंती आहे माझा हा राजीनामा आपण स्वीकारावा.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
आपला नम
श्री. परशुराम उपरकर माजी आमदार
असे म्हटले आहे.