कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीन चे झाले लोकार्पण

आर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी उपयोगी ठरणारी यंत्रणा

कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)

भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केलेली. गुरुवारी या सी आर्म मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते फीत कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर, वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिलकुमार देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले- काळगे,डॉ.धनंजय रासम ,डॉक्टर हेमा तायशेटे,माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, सहाय्यक आधी सेविका सायली तिवरेकर, परिस्थिती का वंदना गायकवाड प्रशांत बुचडे फार्मासिस्ट प्रीती कोरगावकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महायुतीचे सरकार आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काम करते -आ. नितेश राणे

आम. नितेश राणे म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष देण्यात आले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अनेक वर्षापासून सी आर्म मशीन ची मागणी होत होती. हे लक्षात घेऊन मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केले होते. त्यातून ९० लाख रुपयांची सी आर्म मशीन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. या मशीनचा फायदा कणकवली तालुक्यासह अन्य तालुक्यातील रुग्णांना होणार असून चांगल्या रुग्णसेवेत भर पडणार आहे. आरोग्य सेवा अजून सक्षम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती केली जाणार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.