कणकवली विधानसभेतुन पहिल्या टप्प्यात २३८ रामभक्त अयोध्येला रवाना..

नांदगाव येथे आमदार नितेश राणे यांनी राम भक्तांची भेट घेत प्रवासाला दिल्या शुभेच्छा..

कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील राम भक्तांना अयोध्या दर्शनासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड, कणकवली, वैभववाडी या मतदार संघातून पहिल्या टप्प्यात २८३ रामभक्त घेवून बस रवाना झाली. प्रभू रामचंद्र की जय….जय…श्री राम…जय श्री राम.. अशा राम घोषणा देण्यात आल्या.आमदार नितेश राणे राम भक्तांची नांदगाव येथे भेट घेवून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.आमदार नितेश राणेंनी श्रीफळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली आहे. व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या . जय श्री राम च्या घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता.प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्री राम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या जाण्यासाठी राम भक्त रवाना झाले आहेत.

यावेळी मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, महीला तालुका अध्यक्षा सौ.हर्षदा वाळके, माजी सभापती दिलीप तळेकर , हनुमंत वाळके, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, रज्जाक बटवाले, अब्बास बटवाले, कमलेश पाटील आदी उपस्थित होते.