देशात मोदी गॅरंटी चालत असल्याने काँग्रेसचे नफरतचे दुकान बंद होणार -आ.नितेश राणे

जुने काँग्रेस वाले पक्ष सोडतात, देशभरात अनेक पक्ष भाजप सोबत जोडले जातात ; महाराष्ट्रात समान नागरी कायदा यावा म्हणून मागणी करणार..

कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)
आपला देश मोदी मय झालेला आहे. त्यामुळेच देशभरातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते भाजप आणि मोदी यांच्या सोबत जोडले जात आहेत. २०३४ मध्ये मोदी गॅरंटी चालणार आहे.याची माहिती सर्वांनाच असल्याने त्यामुळे सर्व पक्ष भाजपा सोबत येत आहेत.काँग्रेसच्या नफरत च्या दुकानात जुने काँग्रेस वाले पण राहायला बघत नाहीत. आता हे दुकान बंद होणार आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते.

आज सकाळी नेहमी सारखा गांधी कुटुंबियांची आणि नेहरूंची काँग्रेस कार्यकर्ता चाटत नाही तेवढी संजय राऊत बोलत होता.आपण काँग्रेस चा मोठा कार्यकर्ता असल्यासारखं दाखवत आहे.आता त्याच पुढंच टार्गेट काँग्रेस फोडणे हेच आहे. आता त्याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की संजय राजाराम गांधी म्हणायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गांधी आणि नेहरू या आडणावामुळे आपला देश प्रगती करू शकला नाही हे जनतेला सांगितले.आणि मोदींनी दहा वर्षात करून दाखवले.राहुल गांधी ना स्वतःच्या गांधी नावाच्या आरक्षणाची चिंता लागली आहे. राज्यसभेत संजय राऊत ची मत मोजायला कोण गेले आणि विचारायला कोण गेले. ३२ मधील किती राहतील हा प्रश्न आहे,असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
वन खात्याने वन्य प्राण्यांचा त्रास थांबवावा आमच्या जिल्ह्यात हा त्रास जनतेला होत आहे असा टोला उबाठा नेत्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करताना केला.याच अधिवेशनात समान नागरी कायदा राज्यात यावा अशी मागणी मी सरकार जवळ करणार आहे.संजय राऊत विसरला असेल त्याच्या आणि मालकाच्या घरात किती गुंड राहतात याची माहिती त्याने दयावी.नाहीतर आम्ही देवू असे एका प्रश्नावर उत्तर देताना आमदार नितेश राणे म्हणाले.महिलांवर बलात्कार खुनाचे आरोप असलेला आदित्य ठाकरे गुंड आहे असा फोटो टाकावा.भांडुप आणि मातोश्रीवर असलेल्या गुंडांना पकडा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ करणार आहे.
संजय राऊत चे कोल्हापूर येथील छत्रपतींच कुटुंब नेक्स्ट टार्गेट आहे का ? असा सवाल करत तोडफोड मध्ये राऊत ने पीएचडी केली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.