कणकवली येथे ‘घर चलो अभियान’ गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ
कणकवली दि .८ फेब्रुवारी(भगवान लोके)
सरकारच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहचवून महायुती सरकारच्या माध्यमातून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गावात झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विकासकामांचा आढावा घेतला जाईल.आम्ही आणि आमचे सहकारी घर चलो अभियान अंतर्गत लोकांपर्यत जात आहेत.त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहचण्याचे काम आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन आ.नितेश राणे यांनी केले.
कणकवली विधानसभा मतदार संघात आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘घर चलो अभियान’ गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.या अभियानाची सुरूवात वागदे-गोपुरी आश्रम येथे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी ग्रामीण मंडळ तालुकाध्यक्ष संतोष कानडे, वागदे सरपंच संदिप सावंत, जिल्हा बँक संचालक समिर सावंत, शहराध्यक्ष मिलींद मेस्त्री, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष समिर प्रभूगावकर, हळवल चे माजी उपसरपंच लक्ष्मण गावडे, संतोष गुरव, प्रज्वल वर्दम, वागदे उपसरपंच शामल गावडे, सदस्या संजना गावडे आदी उपस्थित होते.
यादरम्यान आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बुथ अध्यक्ष यांच्या सहकार्याने वागदे गावात ‘घर चलो अभियान’ राबविण्यात आले. यावेळी वागदे गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दिवार लेखन करण्यात आले. मोदी
या दरम्यान एका बचतगटाच्या समस्या जाणून घेताना बचतगटातील महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. तसेच व्यवसायीक विषयावर बोलताना सांगितले व्यवसाय वेगवेगळया प्रयोगामुळे करू शकतो. तसेच योग्यप्रकारे नियोजन करून बचतगटांना रोजगार निर्मिती करून देऊ, गावात असलेल्या नेटवर्क समस्येबाबत लवकरच उपाययोजना करू, बस समस्या लवकरच सोडवू तसेच येणाऱ्या पुढील दिवसात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयासह बचत गटांना देखील स्वतंत्र कार्यालय करून देण्यात येईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सिंधुरत्न योजना, अंत्योदय हाच मंत्र, सशक्त शेतकरी समृद्ध भारत, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, राष्ट्र प्रथम सशक्त भारत, पायाभुत सुविधांचा अभूतपूर्व विकास, आरोग्य धनसंपदा, महिला शक्तीला नवी गती, राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, जलयुक्त शिवार योजना, कृषीकल्याण यासारख्या विविध योजनांची तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची या ‘ घर चलो अभियान’ गाव भेट दौऱ्यादरम्यान उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी श्री.गावडे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना अनेकदा लोकांपर्यंत पोहचत नाही. यासाठी हे ‘घर चलो अभियान’ राबविले जात आहे.
ग्रामीण मंडळ तालुकाध्यक्ष संतोष कानडे म्हणाले, २०२४ ला आपल्याला हक्काचा खासदार निवडुन द्यायचा आहे. आ.नितेश राणे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी आपणास मिळाला हे आपलं भाग्य आहे. सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे असं केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे स्वप्न आहे. त्यामुळे ज्यांना सक्षम बनायचे आहे त्यांनी छोटे-छोटे उद्योग सुरू केले पाहिजेत. यासाठी आम्ही जिल्हा बँकेचे प्रतिनिधी देखिल आपणास योग्य मदत करू. प्रत्येकाने घरा-घरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती दिली पाहिजे. असे ते म्हणाले.