सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील समस्त राम भक्तांसाठी अयोध्या येथील रामलल्ला दर्शनासाठी खास आस्था ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून शेकडो राम भक्त आयोध्येसाठी रवाना झाले.त्यावेळी माजी आमदार राजन तेली ,माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक व आरोग्य सभापती आनंद नेवगी,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,शहर सरचिटणीस विनोद सावंत,युवा नेते बंटी पुरोहित, मळगाव सरपंच स्नेहल जामदार,उपसरपंच हनुमंत पेडणेकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर आदी रामभक्त उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून शेकडो राम भक्त...