शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे राजकीय दृष्ट्या आजच्या परिस्थितीत अडचणीत

भविष्यात निवडणुकीच्या तोंडावरही ते यापेक्षाही हतबल-तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे राजकीय दृष्ट्या आजच्या परिस्थितीत अडचणीत आले आहेत त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अपशब्द वापरणाऱ्या नारायण राणेंचे त्यांना पाय धरावे लागत आहेत. भविष्यात निवडणुकीच्या तोंडावरही ते यापेक्षाही हतबल असतील अशी टीका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
तर शिवसेनेने मंत्रीपद दिल्यानंतरही पक्षांच्या स्थानिक कार्यक्रमांना मदत करताना जे हतबलता दाखवित होते ते दीपक केसरकर मंत्रीपदासाठी कोट्यावधी रुपये कसे काय देऊ शकतात? उलट त्यांनी शालेय शिक्षण मंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना किती पैसे दिले हे जाहीर करावे असा टोलाही श्री राऊळ यांनी लगावला.
श्री राऊळ यांनी शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेत मंत्री केसरकर यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बाळू माळकर,सुनील गावडे,विनोद ठाकूर आधी पदाधिकारी उपस्थित होते. श्री राऊळ म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची मध्ये वाढली असे केसरकर म्हणत आहेत परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि आता तुम्ही शिवसेना सोडली तरी शिवसेनेला काडी मात्रही फरक पडलेला नाही शिवसेना पूर्वी होती तेवढी आजही आहे उलट त्यावेळी केसरकर नसतानाही शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. मात्र आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना झालेली गर्दी आणि एक वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या सभांना झालेली गर्दी पाहता केसरकर हे विसरले आहेत पण स्वतःचे अपयश लपवण्यासाठी ते गंभीर आरोप करत आहेत. ते मंत्री पदासाठी एक कोटी रुपये धनादेशाद्वारे दिले असल्याचे म्हणत आहेत मात्र शिवसेनेने त्यांना मंत्री केल्यानंतरही स्थानिक कार्यक्रमांना हतबलता दाखवणारे हे केसरकर कोट्यावधी रुपये देऊ शकतात का? हा प्रश्न आहे. आज आजचे शिंदे सोबत गेले आणि शिक्षण मंत्री पद मिळवले मग हे मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी शिंदेंना किती पैसे दिले हे जाहीर करावे.
श्री राऊळ पुढे म्हणाले, दीपक केसरकर यांची राजकीय परिस्थिती पाहता ते अडचणीत आलेले आहेत या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना आता नारायण राणेंचे पाय धरावे लागत आहे परंतु ज्या राणेंनी त्यांच्या वडिलांना हिणवले त्याचेच हे पाय धरत आहेत याचा अर्थ केसरकर किती हतबल झाले आहेत हे स्पष्ट होते. उलट पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंतवाडी मध्ये बोलताना ठराविकच भाष्य केले मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर होणार्या जाहील सभेत अजूनही बोलतील त्यावेळी ते अजून हतबल होतील.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कृतज्ञ म्हणणाऱ्या केसरकारांना पक्षप्रमुखांनी वेळोवेळी मदत केली आहे मात्र केलेले उपकार ते विसरले असतील पण शिवसैनिक कधी विचारणार नाहीत उद्या एकनाथ शिंदेंकडूनही मंत्रीपद न मिळाल्यास ते शिंदेंवरही अशाच प्रकारे आरोप करतील.

शासनाच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर होऊ घातलेल्या महा संस्कृती मेळाव्याला कोट्यावधी रुपये उधळले जात आहे चौकशीची मागणी करणार आहोत. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी असून येणाऱ्या काळात सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून उचल घेण्यात असल्याचेही रुपेश राऊळ यांनी सांगितले.