सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
पक्ष काढून घ्या चिन्हही पळवा परंतु जनतेच्या मनात असलेलं शरद पवार यांचे स्थान कोणीच काढून घेऊ शकत नाही. आजही आम्ही शरद पवारांसोबत आहोत आणि यापुढेही त्यांच्यासोबत राहू त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवू असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला.
तर पक्ष आणि चिन्ह हे आमच्यासाठी दुय्यम आहे कारण शरद पवार हा विचारच आमच्यासाठी पुरेसा आहे भविष्यात नवीन चिन्ह कुठलेही असो ते घराघरात पोहोचवण्याचे काम आम्ही सर्वजण निश्चितच पार पाडू असा विश्वासही श्री सामंत यांनी व्यक्त केला.
कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,अर्चना घारे, प्रसाद रेगे, भास्कर परब, देवा टेमकर, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर, सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, पुंडलिक दळवी सुहास कुडाळकर, सलीम नाबर, तैसीब आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर, वैभव परब, याकुब शेख, अवधूत मराठे, प्रशांत पांगम आदी उपस्थित होते.
श्री सामंत म्हणाले, युनिक वर्सेस यांनी पक्ष वाढवला मोठा केला तोच पक्ष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावर एका दिवसात काढून घेण्याचे काम ज्यांना मंत्री पद दिली ज्यांना मोठं केलं अशा लोकांनी विश्वासघाताने केला आज निवडणूक आयोग हे स्वतंत्र संस्था राहिली नाही ही संस्था बटीत झाली आहे त्यामुळे या एकूणच कारभाराबाबत जनतेच्या मनात तीव्र चीड निर्माण झालेली आहे. पक्ष चोरला किंवा चिन्ह पळवलं म्हणून काही फरक पडणार नाही आजही राष्ट्रवादी व पवार हे नातं अतूट आहे याआधीही होतो आणि यापुढेही आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहोत. पक्ष आणि चिन्ह हे आमच्यासाठी दुय्यम बाब आहे आम्ही मिळालेले चिन्ह निश्चितच घराघरात पोहोचवण्याचे काम करणार आहोत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतच खरी राष्ट्रवादी कोणासोबत आहे हेच दिसून येईल.
श्री भोसले म्हणाले, राजकारणात सुरू असलेले हे घडामोडी लक्षात घेता आज लोकशाही संपून हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे या हुकूमशाहीला येणाऱ्या काळात इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच उत्तर देण्यात येणार आहे अजित पवार सारख्या नेतृत्वाने आज केलेलं कृत्य हे दुःखदायक आहे जनता सुज्ञ आहे ते ती त्वेषाने पेटून उठली आहे त्यामुळे आमचाच पक्ष करा असे म्हणणाऱ्या अजित पवार यांना त्यांची जागा काय आहे ते येणाऱ्या दिवसातच कळेल.
सौ घारे म्हणाल्या, कोणी कितीही बढाया मारल्या तरी सच्चा कार्यकर्ता हा आजही शरद पवार यांच्या सोबतच आहे तो कुठेही जाणार नाही कारण गाडीचा लोगो चोरून नेला तरी त्या गाडीची किंमत कमी होत नाही आज आमच्याकडे ना पक्ष ना चिन्ह आहे मात्र आमच्याकडे शरदचंद्र पवारांसारखा बाप मात्र निश्चितच आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता निश्चितच योग्य न्याय देईल.
आमदारकी आणि मंत्रीपद
चेक च्याच तंत्राने..
मंत्रीपदासाठी चेक दिला असे खुद्द दीपक केसरकर यांनी स्पष्ट केल्याने आजपर्यंत त्यांनी मिळवलेली आमदारकी आणि आत्ताचे मंत्रीपदही चेक आणि खोक्याच्या तंत्राने मिळवले असे सिद्ध होते असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लगावला. तर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असल्याने ज्यांनी चेक घेतला व ज्यांनी चेक दिला अशा दोघांवरही गुन्हे दाखल करा असे यावेळी अमित सामंत म्हणाले.