सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
नेमळे येथील श्री देव कलेश्वर मलेश्वर पंचायतानाचा वर्धापन दिन संप्रोक्षण विधी व रुद्र याग अनुष्ठान सोहळा मंगळवार दि 20 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार दि 22 फेब्रुवारी 2024
या कालावधीत नूतन निर्मित कलेश्वर मलेश्वर देवतेचे मोहरे, तरंगस्थित रवळनाथ, भूतनाथ, पावणाई या देवताच्या काष्टनिर्मित पिंडिका, स्थळ, कुळ, पवार यांचे कुळपाटे व त्यावरील देवता यांचा संप्रोक्षण विधी व रुद्रयाग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे तरी सर्व देणगीदार, शिमधडे, भाविक, भक्त,यांनी या संपन्न होणाऱ्या सोहळ्यास उपस्थित राहून श्री कलेश्वर मलेश्वर कृपेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.