माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्याबाबत केली मागणी

सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावातील धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीबाबत कोणताही मोबदला अद्यापपर्यंत न मिळाल्याने माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मागणी केली.त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे दोडामार्ग मंडल अध्यक्ष श्री.सुधीर दळवी, राजाराम आईर ज्ञानेश्र्वर आईर मनोहर आईर शिवाजी आईर गुरुदास आईर निलेश आईर गणू आईर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.