मालवण ,दि.८ फेब्रुवारी
मालवण वायरी भूतनाथ येथील रेकोबा हायस्कूल येथे विद्यार्थी हक्क कृती समिती आणि मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात २० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन टोपीवाला हायस्कूलचे माजी शिक्षक विनायक कोळंबकर, रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी हक्क कृती समितीच्या अध्यक्ष कु. दीक्षा लुडबे, ऐश्वर्य मांजरेकर, पूर्वा वेंगुर्लेकर, मातृत्व आधारचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, संतोष नागवेकर, संतोष चव्हाण, विजयकुमार रावले, संतोष सकपाळ, सिद्धेश लुडबे, ढोले बाबू, गणेश लुडबे, संदीप लुडबे, सुभाष पाटकर कोकण वाइल्ड लाईफ रेसक्यूचे आनंद बांबरडेकर आणि सहकारी, सौ. गौरी सातार्डेकर, सौ. नीलिमा रावले, सौ. रविना लुडबे, ममता तळगावकर, ऋतुजा ठाकूर, मंदार आजगावकर, साक्षी पालेकर, महिमा मसुरकर, दर्शना देऊलकर कृष्णा देऊलकर, अक्षता परब, सुरेश लुडबे, विश्वनाथ लुडबे, फॅनी फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, प्रवीण लुडबे, आप्पा लुडबे (योगा) मनोज खोबरेकर, विशाल ओटवणेकर, अक्षय हळदणकर, वर्षा मोरजकर, बाबू मोरजकर, दिगंबर लुडबे, समीर पाटकर, विजय तळगावकर उपस्थित होते. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय मधील डॉ. स्नेहल सावंत आणि रक्तपेढी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.