कुडाळ येथे कार्यकर्त्यांसोबत १८ फेब्रुवारीला मेळावा ; नेमलेल्या निरीक्षकांनी आपल्या शाखा तरी काढली का?
कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)
मनसेने माझी हकालपट्टी करण्याचा प्रश्नच नाही,तर गेले दीड वर्षे पक्षाच्या कोणत्याही मीटिंगला जात नव्हतो .माझ्या व्यथा मनसे नेते शिरीष सावंत यांच्याकडे मांडल्या होत्या.त्याला पक्षनेतृत्वाने न्याय दिला नाही.मध्यल्या काळात निरीक्षक नेमले, त्या निरीक्षकांनी पदावरून काढलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदे दिली.त्यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.तरीही कोणतीही दखल घेतली नाही.कुडाळ येथे कार्यकर्त्यांसोबत १८ फेब्रुवारीला मेळावा घेतला आहे.आमचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो माझा पुढील निर्णय असेल अशी माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पक्षाकडून निरीक्षक पाठवले ते स्वतः च्या गावात शाखा काढू शकत नाही.ते काय करणार ?त्यांनी चुकीची माहिती अध्यक्ष राज ठाकरे व वरिष्ठ नेत्यांना दिली.काही पदाधिकाऱ्यांना बदल करा,अशी आमची मागणी राज ठाकरे यांच्याकडे होती.मात्र,त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.अनेक वर्षे जिल्ह्यातील पक्ष जिवंत ठेवला,हे तरी त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज होती.मी २०१४ पासून संघटनेची धुरा सांभाळली.मधल्या तीन वर्षाच्या काळात मोठ्या आजाराला सामोरे गेल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पक्ष संघटनेत प्रामाणिक कामाला लागलो.मात्र,मनसेच्या नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचे आपणाला दुःख होत आहे,असे सांगताना उपरकर म्हणाले,गेल्या दीड वर्षापासून पक्षाच्या बैठकांमध्ये सहभागी होत नव्हतो.मी सद्या माजी आमदार म्हणून काम करीत होते.मी पक्षाचा सदस्य आणि पदाचा राजीनामा दिला आहे,असे त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे मनसेच्या माध्यमातून विविध प्रश्न मांडून लढत होतो.गेले दोन महिने माजी आमदार म्हणून काम करीत होतो.मी आता पदमुक्त आणि पक्षमुक्त झालो.परवाचे आंदोलन हे देखील माजी आमदार म्हणून पत्रव्यवहार केला आहे.बऱ्याच कार्यकर्त्यांनी फोन केलं आहेत.जो काही निर्णय कार्यकर्ते सांगतील तो निर्णय घेतला जाईल.माजी आमदार म्हणून काम करीत राहीन.माझ्यासोबत जिल्ह्यातील ४०० कार्यकर्ते आहेत.मला पत्र मिळालेलं नाही,पत्रात कुठलेही हकालपट्टीची उल्लेख नाही.त्यामुळे आता अजूनही कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही,असेही श्री उपरकर यांनी दिली.