सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आपल्याकडे खेचून
घेणाऱ्या अजित पवार गटाच्या विरोधात आज शरद पवार गटाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन केले. यावेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून अजित पवार गट व सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी चिन्ह आणि पक्ष गेला तरी आम्ही घाबरणार नाही. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना त्याच ताकदीने सामोरे जाऊ, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला. येथील डॉ आंबेडकर पुतळ्यासमोर हे मुक आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे, प्रसाद रेगे, भास्कर परब, देवा टेंमकर, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर, सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, पुंडलिक दळवी, सुहास कुडाळकर, सलीम नाबर, तैसीफ आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर, वैभव परब, याकुब शेख, अवधूत मराठे आदी उपस्थित होते.