सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, वेंगुर्ले आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्याचे सुयश :
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. सरस सतीश नाईक ‘ या विद्यार्थ्याने शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, वेंगुर्ले येथील बालकुमार चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथी या स्पर्धा गटातून ‘ कु. सरस सतीश नाईक ‘ या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. याकरिता त्याला प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर तसेच शालेय चित्रकला शिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.