पणदूर संविता आश्रमाच्या नूतन इमारतीचे उद्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उदघाटन

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून इमारतीसाठी २५ लाख रु. निधी

कणकवली दि .८ फेब्रुवारी(भगवान लोके)

आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून पणदूर येथील संविता आश्रमाच्या नूतन इमारतीसाठी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतुन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून या इमारतीचा उदघाटन सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला संविता आश्रमाच्या हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करून सेवा देण्यात येते.या आश्रमासाठी आवश्यक असलेल्या इमारतीसाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी ताबडतोब २५ लाखाचा निधी मंजूर करून देत वर्षभरात इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीचा आश्रमातील निराधार बांधवांसाठी मोठा उपयोग होणार आहे.