मनसेचा रविवारी सावंतवाडीत कार्यकर्ता मेळावा

सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा रविवार दि. ११फेब्रुवारी रोजी सकाळी १०वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शेकडो युवक मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश करणार आहेत. या वेळी मनसे राज्य सरचिटणीस व जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी ,मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केले आहॆ.