सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सुधारीत करणे या कामाचा भूमीपूजन सोहळा शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.श्री. दिपक केसरकर, आमदार श्री. निरंजन डावखरे, आमदार.श्री.अनिकेत तटकरे , आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हाधिकारी .श्री.किशोर तावडे, पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिम्मेदान होणार आहे
सदर योजनेसाठी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग शासन ५६.१७ कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत धरणाची सुधारणा करणे, नवीन जलशुष्टीकरण केंद्र बांधणे, शहरातील झिंरग व गरड पाण्याच्या टाक्यांची उभारणी करणे, पाळणेोड धरण ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत गुरुत्ववाहिनीने उसे शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारणे इ. कामे करण्यात येणार आहेत.
सावंतवाडी पाणीपुरवठ्या संबंधी ही एक महत्वाची योजना असून सदर योजनेच्या भूमिपूजनास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यानी केले आहे.