सिंधुदुर्गनगरी,दि.८ फेब्रुवारी
उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व सत्र न्यायाधीश एस एस जोशी, जिल्हा न्ययाधीश व सत्र न्यायाधीश-2 व्ही एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए.बी कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी. तिडके, प्रतिधारीत विधीज्ञ अॅड यतिश खानोलकर, अॅड. आशपाक शेख, अॅड. मनिषा नरे, अॅड. अमोल सामंत, अॅड श्वेता तेंडोलकर, अॅड आरती पवार सहाय्यक लोकअभिरक्षक, लोकअभिरक्षक कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
या मोबाईल व्हॅनचा वापर करून सर्वसामान्यांपर्यत कायदेविषयक माहिती पोहोचण्यासाठी कायदेविषयक शिबीर आवळेगाव हायस्कुल आवळेगाव या ठिकाणी दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमास आवळेगाव हायस्कुलचे प्राचार्य डी. टी काळे, सरंपच श्रीम. पूर्वा सामंत, आध्यापक व विदयार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अॅड. श्वेता तेडोलकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना कौटुंबिक हिंसाचारापासून माहिलांचे सरंक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, हुंडा प्रतिबंधक कायदा, स्त्रीयांबाबत पोटगीच्या तरतुदी मुलींच्या शिक्षणाचे महत्व व महिलांना मिळणाऱ्या विधी सेवा व सवलती या सर्व विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अॅड प्रणिता कोटकर, यांनी बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. आशपाक शेख यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार या विषयावर मोफत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे, यांनी विधी सेवा व सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात कायदेविषयक माहितीपत्रकांचे वाटप करणेत आले.