आमदार नितेश राणे यांनी देवगड मधील आंबा बागायतदारांना दिलेला शब्द खरा केला

 देवगड मध्ये ए. वाय. मुंज या कीटक शास्त्रज्ञांची नेमणूक 

देवगड,दि.८ फेब्रुवारी

देवगड मध्ये अंबा बागायतीवर थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असून, या प्रादुर्भावामुळे आंबा पीक हातचे गेले आहे. यावर संशोधन करणे अभ्यास करणे व उपाय करणे यासाठी कीटक शास्त्रज्ञाची गरज होती. आमदार नितेश राणे यांनी काल भेटलेल्या शिष्टमंडळाला तातडीने आपण याबाबत कार्यवाही करू असे सांगून 24 तासात कीटक शास्त्रज्ञ हजर होईल असे आश्वासन दिले होते वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातील कीटक शास्त्रज्ञ ए वाय मुंज हे देवगड येथील रामेश्वर फळ संशोधन केंद्रामध्ये हजर झाले असून यामुळे नितेश राणे यांनी आपला शब्द पाळला आहे.

बागायतदारांच्या मदतीसाठी असलेले प्रस्ताव तातडीने तयार करावेत तसेच अडचणी बाबतही प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावेत याबाबत मला अवगत करून द्यावे असे कृषी अधिकाऱ्यांना सांगितले होते .यानुसार कार्यवाही सुरू झाली असून लवकरच याबाबत कृषी मंत्र्यांशी बैठक अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येवर समस्या बाबत थेट आमदार नितेश राणे यांनी वरिष्ठ स्तरावरून लक्ष घातल्याने लवकरच यावर उपाय निघेल असा विश्वास बागायतदारांनी व्यक्त केला आहे.